सावरी गिरोला इरई नदीवरील पुलाच्या कासवगतीच्या कामामुळे ५ गावाचा संपूर्ण तुटला

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - वरोरा व चिमूर तालुक्यातील अखेरच्या टोकावर असलेल्या ईरइ नदीवरील  नवीन  पूल बनवण्याचे काम सुरु होते.पण  संबंधित ठेकेदार यांच्या कासवगतीच्या कामामुळे  पावसाळा सुरु झाला तरी काम काही पूर्ण झाले नाही.काम सुरु करण्याच्या वेळेस जुना पूल तोडून नवीन रापटा बनवून रहादारी चालू केली.पण  पावसाच्या पुरामुळे संपूर्ण रापटा वाहून गेला. त्या मुळे सावरी (चिमूर )ला जाण्याचा मार्ग पूर्ण बंद झाला. पाच गावांचा संपर्क तुटल्याने सावरी ला बाजार, बँक  शाळा, सरकारी दवाखाना  असल्यामुळे  गिरोला पार्डी अकोला रोज सावरी  चिमूर ला कामनिमित्त जावे लागत होते.परंतु पूलाच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना व विध्यार्थी यांना त्रास सहनकरावा लागत आहे शाळेतील  मुलाचे फार मोठे नुकसान झाले आहे पुलाअभावी   सावरी येथे एकही विद्यार्थी शाळेत नाही.दवाखान्यात जाणे बंद झाले आहे, बँकचे  व्यवहार ठप्प झाले आहे. त्या मुळे शेतकरी व जेष्ठ नागरिक यांना फार त्रास होत आहे.तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लवकरात लवकर यावय पर्यायी व्यवस्था सावरी ला जाण्यासाठी करून देण्यात यावी अशी मागणी मेघशाम  दाभेकर  संजय मोडक सुधाकर राजूरकर, मंगेश गजभिये, दीपक उमरे  निखिल मोडक, संतोष गजभिये,मंगेश घानोडे, निखिल जुनघरे गिरोला, पार्डी,अकोला येथील  ग्रामवाशीयांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!