काय ते चिखल काय तो बंधारा काय तो सावरी बोथली रस्ता एकदम ओके

लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग कर्मचारी गाळ झोपेत - सामाजिक कार्यकर्ते दिलीप नागपूरे यांचा आरोप

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील आखरी टोकावर सावरी हे गाव असे शेतकऱ्याना शेतात जाण्या-येण्या साठी बोथली हा शिव मार्ग आहे. हा ३ किलोमीटरचा मार्ग असून याच मार्गावरुन शेतकरी शेत मंजूर जाने येणे करीत आहेत.मागील काही वर्षा पूर्वी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मातीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता चिखल मय झाला आहे‌.या रस्त्याची खडीकरण करण्यात यावे यासाठी सावरी व बोथली येथिल शेतकऱ्यांनी वारंवार खडीकरण रस्त्यांची मागणी लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाला करुन सुध्दा याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.म्हणून वरिष्ठ अधिकारी यांनी सावरी व बोथली रस्ता मंजूर करुन तत्काळ बनविण्यात यावे अशी मागणी सावरी व बोथली येथिल शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते दिलीप नागपूरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!