चिमूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार कार्यालयीन वेळेत अधिकारी गैरहजर - बबलू शेख तालुका अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फाउंडेशन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.२७/०७/२०२२ चिमूर तालुका हा नावाजलेला तालुका आहे.येथील ग्राम पंचायत  कार्यालयाचे उद्घाटन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते झाले आहे. असे असतांना नगर परिषद चिमूर येथे आजपर्यंत प्रभारी मुख्याधिकारी होते परंतु आज स्थायी मुख्याधिकारी असल्याने संपूर्ण कारभार या चिमूर नगर परिषद चा मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया राठोड यांचेकडे आहे.असे असतांना मुख्याधिकारी तथा ईतर कर्मचारी यांची सकाळी १०:२० वाजताच गैरहजेरी असेल तर कसं ? यामुळे जनतेला कामाविना आल्या पाऊली परत जावे लागले.५ दिवसांचा शासनाने आठवडा केला तेव्हापासून सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०६:१५ असे शासनाचे वेळापत्रक आहे.तरीही अधिकारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणे हे चुकीचे आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे व कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी वर्गावर CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी अशी मागणी बबलू शेख तालुका अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फाउंडेशन यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!