चिमुर नगर परिषदेचे पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष - पप्पू शेख काँग्रेस मीडिया प्रमुख
काही प्रभागातील जनाता पिण्याच्या पाण्यापासून वंचित
व्यवस्था न केल्यास आंदोलनाचा इशारा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमुर नगर परिषदे अंतर्गत अभ्यंकर मैदान येथे पाण्याची टाकी पडण्याच्या अवस्थेत झाली आहे. आणि काही दिवसा आगोदर त्या टाकिच्या पायऱ्या तुटुन पडल्या परंतु यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण आता १५ ते २० दिवस होत आहे. त्या टाकीमध्ये आता पाणी भरत नसल्याने काही प्रभागातील जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही आहे. याकडे नगर परिषद का दुर्लक्ष करीत आहे ? त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का नाही ? प्रभागातील जनता नियमित पाणी कर भरत नाही का ? नगर परिषदेने त्यांची येत्या दोन तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळाद्वारे किंवा टँकरने तरी व्यवस्था करावी अन्यथा पिण्याच्या पाणी करीता नगर परिषदे समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!