उपविभागीय अधिकारी प्रकाश शंखपाळ यानी दिली शेतकऱ्यांच्या आदोलनास भेट..


 स्वता गाळन असलेल्या रस्त्यावर जाऊंन केली रोडची पाहणी..
शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन घेतले मागे....

शेगाव(जगदीश पेंदाम)
   चिमूर तालुक्यातील आखरीच्या टोकावर असलेल्या माखोना पांजरेपार रीट सिवारातील शेतकऱ्यांनी शेतात जान्याच्या रस्त्या संदर्भात आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला सोमवारी दिला होता याची तात्काळ दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यानी घटनास्थळाला भेट दिली असता शेतकऱ्यांनी तुरतास आन्दोलन मागे घेतले आहे..
सोमवार दिनांक 25 जुलाई रोजी शेताकडे जाणारा रस्त्या करीता शेतकऱ्यांनी आंदोलन करतेवेळी विषारी किटाणु नाशक औषधी घेऊन शेकडो शेतकरी आन्दोलनाला बसले होते, माखोना ते पांजरेपार हा 3 किलोमीटरचा मार्ग असून याच मार्गावरुन शेतकरी, शेत मंजूर जाने येणे करीत आहेत, मागील 3 वर्षापासून हा रस्ता खडीकरण व्हावा या मागणी साठी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधि यांना वारंवार निवेदन देण्यात आले होते तसेच विविध संघटनेच्या माध्यमातून सुधा निवेदन देण्यात आले होते, पन आश्वासन शिवाय शेतकऱ्यांचा  हाती काहीच मिडाले नव्हते,रस्ता चिखलमय झाल्यामुळे शेतातील सर्व कामे होते, या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी सोमवारी आत्मदहनाचा इशारा प्रशान्नाला दिला होता..  
शेतकरी आन्दोलनाची बातमी चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ याणा माहिती होताच माखोना येथील आन्दोलन स्थळी भेट दिली, व सम्पूर्ण चिखलमय झालेल्या रोडवर शेतकऱ्यासोबत जाऊंन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली, व शेतकऱ्यांसोबत रस्त्या संदर्भात चर्चा करुण आन्दोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली असून शेतकऱ्यांनी तात्पुरते  आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, यावेळी प्रकाश संकपाल यानी सावरी ग्राम पंचायत तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, उपविभागीय अभियंता समीर उपगंलावार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम सेवक सरपंच व गावकरी यांचेसी चर्चा करून संबंधित विभागाने ताबड़तोड़ काम मार्गी  लावण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!