कोरंबी जंगलात आढळून आला बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा मृतदेह
आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील खापरी कोरंबी जंगलात बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पवनी शहरात व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना हि दिनांक. ८ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता च्या दरम्यान उघडकीस आली आहे. धनंजय आत्माराम कुंभलकर वय ५६ वर्षे रा. रामपुरी वार्ड पवनी असे मृतकाचे नाव आहे.सदर शिक्षकाची हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पवनी येथील धनंजय कुंभलकर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाऊनगाव येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते ते तीन दिवसापासून बेपत्ता होते.आज सायंकाळी काही नागरिक गोसे धरणाच्या उजव्या कालव्या लगतच्या खापरी कोरंबी जंगलात फिरण्यास गेले असता दुर्गंधी आली.त्याठिकाणी जाऊन पाहिले असता अर्धवटप कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.याची माहिती पवनी पोलीस स्टेशन ला देण्यात आली. या घटनेमुळे पवनी व परिसरात एकच खरबड उडाली शंका कुशंकांना पेव फुटले माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळीत जाऊन घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदना करिता पाठविले धनंजय कुंभलकर या शिक्षकाची हत्या करून प्रेत फेकल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात ठाणेदार दिलीप गडरी करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!