पुलाची उंची वाढवण्याची परिसरातील नागरिकांची मागणी...
शालेय विद्यार्थी, गरोदर माता विरुद्ध नागरिक यांना पावसाळ्यात जीव मुठीत ठेवून करावा लागतो प्रवास...
शेगाव... (जगदीश पेंदाम)
वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम कोकेवाड धानोली, किनारा, आष्टा तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी, गरोदर माता शेतकरी, शेतमजूर वृद्ध नागरिकांना आपला जीव मोठे ठेवून प्रवास करावा लागत असल्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे..
गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सगळीकडे विस्कळीत झाले असून नदी नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे त्यामुळे अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, किनारा,आष्टा, धानोली या गावातील शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, वृद्ध नागरिक यांना शिक्षण, दवाखाना, दळणवळणाच्या कामासाठी शेगाव तसेच वरोरा या ठिकाणी जावे लागत असल्याने पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे इरही नदीवर पूलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना आजही आपल्या जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे..
सगळीकडे शेती हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये लागणारे साहित्य खते, बियाणे, औषधी,अवजारे याकरीता सुद्धा त्रास होत असल्यामुळे लोकप्रतिनिधी, शासनाने लक्ष देऊन या पुलाची उंची वाढण्याची मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!