तळोधी येथील अंतर्गत रस्ते वरील खड्डे देत आहेत अपघाताला आमत्रण
तळोधी बा:
येथील ग़्रामपंचायत पंचायत अंतर्गत येत असलेल्या भट्टी वार्ड ते सोनेवाट या अंतर्गत रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवले जात असताना खड्डे त्वरित चुरीगिट्टि टाकून बुजविण्याचे मागणी नागरिकांनी केली आहे. भट्टी वार्ड येथील कामडी यांच्या घरापासून ते सोनेवाट मुख्य मार्गापर्यत अंतर्गत रस्त्याच्या मधोमध मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागतात. तसेच अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कचरा वाढलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी खङ्यात साचून राहते. तसेच गावातील चराईसाठी जाणारे जनावरे सुध्दा या मार्गे जात असताना वाहनधारकांना खड्डे चुकवून वाहने चालवावी लागतात.
तसेच जुन्या पोलिस चौकी समोरुन धान खरेदी बाजार कडे रस्ता सुध्दा अत्यंत दैनीय आणि चिखलाने वेढलेला आहे.
त्यामुळे संबंधित ग़्रामपंचायत पदाधिकारी वर्गानी या मार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे मागणी नागरिकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!