अंधारी नदीला पूर चंद्रपूर मार्ग बंद
मूल चंद्रपूर या राष्ट्रिय महामार्गावरील अंधारी नदीवरील पुलावर पाणी आल्यांने हा मार्ग बंद झाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या राष्टिय महामार्गावरून छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेशात वाहतूक होते. मात्र रस्ता बंद झाल्यांने या राज्यात ये—जा करणार्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरला जोडणारा हा मार्ग आहे. यामुळे या मार्गावरून जाणार्या दोनही जिल्हयातील नागरीकांना या पुराचा फटका बसत आहे. चंद्रपूरला शिक्षण आणि आरोग्यासाठी जाणार्यास आता अडचण निर्माण झाली आहे.
चंद्रपूर गडचिरोली हा राष्ट्रिय महामार्ग तयार करण्यात आला असला तरी, अंधारी नदीवरील पुल हा जुनाच आहे. तो अतिशय खाली असून, वारंवार या पुलावर पाणी येवून मार्ग बंद होत असल्यांने शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!