स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर चिखलापार वासीयांना मिळाली पुरापासून मुक्तता
चिमूर विधानसभा नेते डॉ.सतीश वारजूरकर यांनी स्वतः जाऊन केली पाहणी
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२२/०७/२०२२ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेते डॉ.सतिश वारजूकर यांनी चिखलापार वासीयांची सर्वात महत्वाची पुराची समस्या होती. वर्षोनुवर्षे गावकऱ्यांची मागणी असलेल्या रस्त्याची समस्या सोडविली व स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर अखेर पूर परिस्थिती पासून चिखलापार हे गांव अतिवृष्टी च्या समस्सेपासून मुक्त झाल्याने गावकऱ्यांनी आज आंनद व्यक्त केला. चिमूर तालुक्यातील चिखलापार गावातील नागरिकांना येण्या - जाण्याकरीता करीता खूप अडचणी निर्माण होत होत्या आणि अशातच डॉ.सतिश वारजूरकर यांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ता बांधकामासाठी निधी मंजूर करुन पावसाळा ऋतु सुरू होण्यापूर्वी हा महत्वाचा रस्ता पुर्ण करून दिला.व डॉ.सतिश वारजूरकर यांनी स्वःताच त्या रस्ताने जावून रस्त्याचा आनंद घेतला यावेवेळी ग्राम पंचायत सरपंच संतोशजी डांगे,माजी सरपंच सावरगांव देवानंद गावंडे, चंद्रभान झोडापे,उदालक गेडाम, रायमान झोडापे,भीमरावजी डांगे, पुरुषोत्तमजी झोडापे,रत्नपालजी गेडाम,वामनजी काळे,विजयजी डांगे,बंडूजी डांगे,शहर अध्यक्ष अविनाश अगडे , विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे , मीडिया प्रमुख पप्पू शेख , जिल्हा महासचिव गौतम पाटील , माजी पंचायत समिती उपसभापती तथा विधानसभा अध्यक्ष रोशन ढोक , तालुका अध्यक्ष पर्यावरण विभाग प्रदीप तळवेकर , तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर व आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!