काँग्रेस पक्षाचे चिमूर विधानसभेचे नेते डॉ.सतीश वारजूकर यांनी चिमूर तालुक्यातील पूर पीडित क्षेत्राची केली पाहणी

पूर पीडितांना दिली आर्थिक मदत

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२२/०७/२०२२ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चिमूर विधानसभेचे नेते डॉ.सतीश वारजूकर यांनी चिमूर तालुक्यातील पूर पीडित क्षेत्राची पाहणी करीत कळमगाव येथील पूर पीडित शंकर जाणबा धाडसे , कमल श्रीरामे , दौलत श्रीरामे , राष्ट्रपाल गजभिये , कुसुम डांगे यांना आर्थिक मदत दिली. यावेळी  शहर अध्यक्ष अविनाश अगडे , विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे , मीडिया प्रमुख पप्पू शेख , जिल्हा महासचिव गौतम पाटील , माजी पंचायत समिती उपसभापती तथा विधानसभा अध्यक्ष रोशन ढोक , तालुका अध्यक्ष पर्यावरण विभाग प्रदीप तळवेकर , तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर व आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!