जुना फुटबॉल ग्राउंड , बंदारा व फिल्टर प्लांट कडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांची नगर परिषदेला मागणी

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमुर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या वरोरा रोड लगत जुना फुटबाल ग्राउंड , बंदारा , व फिल्टर प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे.कि याकडे नगर परिषद का लक्ष देत नाही ? असा सवाल काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी उपस्थित केला आहे. त्या रोडने शेतकरी , शेत मजुर , त्यांना सुध्दा आपल्या शेतात बरोबर जाता येत नाही. आणि त्याच रोडने चिमुर शहरातील जनता सुद्धा पिण्याच्या पाणी करीता ये जा करतात लोकांना दोन हाती पिण्याचा पाण्याची प्लॅस्टिक ची डपकी हाती धरून बरोबर साधं बरोबर चालता येत नाही.अनेक वेळा नगर परिषदेला सूचना दिल्या परंतु याकडे का लक्ष देत नाही.  असा प्रश्न जनतेला पडला आहे. याकडे नगर परिषदेणे तात्काळ नियोजन करून रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!