स्थानिक स्वराज्य स्वस्थेत निष्ठावंत कार्यकर्ते यांनाच उमेदवारी दया - कॉग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगडे
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - नगर परिषद निवडणुकाचं बिबूल वाजलं आणि प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळविण्या करिता कार्यकर्ते आणि इच्छुक प्रत्येक पक्षात प्रवेश करतात पण पक्षात वर्षानु वर्ष काम करणाऱ्याना वेळेवर डावलल्या जाते उमेदवारी मिळावी म्हणून निवडणूक जाहीर होताच नेत्यांच्या मागे फिरत असतात पण जे निष्ठावंत कारकर्ते पक्षा करिता काम करतात अश्याना डावलून वेळेवर पक्षात प्रवेश करणाऱ्याना उमेदवारी जाहीर केल्या जाते. अश्या लोकांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी केली आहे.चिमूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षात नेहमीच दोन गट बघायला मिळतात. पण यावेळी सर्व जवाबदारी व तिकीट वाटप डॉ. सतीश वारजूरकर यांच्या नेतृत्वातच होणार असे सर्व पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांचं एक मत आहे.कार्यकर्त्यांनी पण संभ्रमात राहू नये एकीने काम करावे व सत्ता कशी बसविता येईल याकडे लक्ष द्यावे, नगरपरिषद निवडनुका आरक्षण जाहीर झाले कोणाला उमेदवारी मिळणार असे कार्यकर्त्यामध्ये चर्चा सत्र सुरू आहे पण जे कार्यकर्ते पक्ष संघटनेत काम करतात ,चळवरीत असतात अश्यानाच उमेदवारी द्यावी, फक्त निवणूक आली कि दिसतात काही कांग्रेस कार्यकर्ते पक्षा च्या विरोधात जाऊन काम करतात आणि कॉग्रेस पक्षाकडून निवडून येतात व नंतर वेगळ्या पक्षात प्रवेश करतात अश्या ना उमेदवारी देऊ नये २०१४ मध्ये निवडून आलेले कांग्रेस चे नगरसेवक आपल्या स्वार्था साठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि स्वार्थ पूर्ण झालं कि मी फक्त कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे असे मिरवतात अश्याना सुद्धा उमेदवारी देऊ नये अशी मागणी शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!