मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवस निमित्त बल्लारपूर शहरात जिल्ह्यात प्रथमच अनोखा शैक्षणिक उपक्रम
बल्लारपूर (वसंत मुन)
लोकनेते विकास पुरुष मा.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या वाढदिवस निमित संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक व आरोग्य उपक्रम भारतीय जनता पार्टी तसेच सुधीर भाऊ यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने राबविण्यात आला. यातच चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर शहरात ३० जुलै रोज शनिवार ला सुभाष टॉकीज हॉल बल्लारपूर येथे शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य तारामंडळ प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. या तारामंडळ प्रदर्शनी चा *मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य* यांच्या प्रमुख उपस्थितीत व *मा.श्री हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष नगरपरिषद बल्लारपूर* यांच्या अध्यक्षतेत ढोल ताशे वाजवून स्वागत करून शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे आयोजन *इंजि.देवेंद्र वाटकर,श्री किशोर मोहुर्ले,सौ सीमा वाटकर , सौ.जयश्री मोहुर्ले* यांनी केले. *आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार* यांनी विद्यार्थ्यांकरिता नेहमीच नवीन नवीन उपक्रम मोठ्या स्तरावर राबविले असून त्यातून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य कसे घडतील याकडे विशेष लक्ष दिले आहे. यालाच अनुसरून आज भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच तारामंडळ प्रदर्शनी एक नवीन शैक्षणिक उपक्रम आयोजकांच्या वतीने राबवून यातून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात पुन्हा भर पडेल याकडे एक पाऊल टाकण्यात आला. शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन *आदरणीय सुधीरभाऊ* यांच्या प्रति वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी आदरणीय बाबूजी व आदरणीय हरीश भैय्या यांनी आपल्या देशाचे भविष्य असणारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या भविष्याकरिता एक नवीन दिशा दाखविली. प्रदर्शनीच प्रस्तुतीकरण *ब्लूस्टार प्लॅनेटोरियम नागपूर* श्री जयप्रकाश मौर्य यांच्यावतीने करण्यात आले व कसलाही शुल्क घेण्यात नाही आला. ५० मिनिटांचा एक शो असून हा शो झाल्यावर प्रश्नावली घेण्यात आली आणि प्रश्नावलीत उत्तर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शहरातील अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचा स्वागत केले आहे.भविष्यात देखील असे स्तुत्य उपक्रम *आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार* यांच्या वाढदिवस निमित्त किंवा माध्यमातून शहरात राबविल्या जाणार असे मत व्यक्त केल आहे.याप्रसंगी मंचावर भाजपा शहराध्यक्ष काशिनाथ सिंह ज्येष्ठ नेते श्री शिवचंद दिवेदी,श्री समिर केने,श्री श्रीनिवास सूंचुवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री आशिष देवतळे, भाजयुमो शहर अध्यक्ष रनंजय सिंह,महिला आघाडी अध्यक्ष सौ वैशाली जोशी,महामंत्री - सौ वर्षा सुंचुवार,सौ कांता ढोके,माजी नगरसेविका - सौ जयश्री मोहुर्ले,सौ सुवर्णा भटारकर, सौ. पुनम मोडक,नगरसेवक - श्री येल्लय्या दासरफ,श्री महेन्द्र ढोके, सौ आरती अक्केवार,श्री अमन चंदेल, सौ. सिमा वाटकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता श्री राजु दासरवार,श्री भास्कर पेंदोर,श्री नरेश डोंगरे,श्री आशिष चावला,श्री विशाल शर्मा,श्री ऋषिपाल गेहलोत,सौ.प्रगती गेहलोत,श्री अब्दुल आबिद शेख,श्री अझहर रिझवी,श्री राहुल येवले,श्री कार्तिक रामटेके,श्री प्रकाश गजपुरे,श्री संकेत चौधरी,श्री रोहित चुटे,श्री आमिर शेख,रॉबिन यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन इंजि. देवेंद्र वाटकर व किशोर मोहुर्ले यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!