वन महोत्सव अंतर्गत पिलांद्री बिट येथे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील अंड्याळ वनपरिक्षेत्रातील पिलांद्री बिट कक्ष क्रमांक.३०६ संरक्षीत वन सहाय्यीत नैसर्गिक पुर्णनिर्मिती (ANR) क्षेत्र १० हे.आर.मध्ये वन महोत्सव अंतर्गत वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला. सौ.पुजाताई हजारे जि.प.सदस्या भंडारा यांचे हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड कार्यक्रमाला सुरवात करण्यात आहे.ह्यावेळी प्रमोद मेंढे पंचायत समिती सदस्य पवनी,देवेंद्र हजारे माजी जि.प. सदस्य, सौ.प्रतिभाताई चव्हाण सरपंच ग्राम् पंचायत पिलांद्री रत्नाकर बोकडे उपसरपंच पिलांद्री,घनश्याम ठोंबरे वनपरीक्षेत्राधिकारी अंड्याळ,विनोद पंचभाई क्षेत्र सहायक अंड्याळ,प्रबोधिनि न्युज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी जयेंद्र चव्हाण, आकाश कवाळे बिट रक्षक पिलांद्री,मुकेश श्यामकुवर क्षेत्र सहाय्यक किटाळी,जे.डी. हटवार बिट रक्षक केसलवाडा,
सोनु निबांर्ते बिट रक्षक अड्याळ,राजगुरू चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पिलांद्री तसेच अड्याळ वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी,वनमजूर उपस्थित होते. यावेळी रोपवनात ६२५० रोपांची लागवड करण्यात येणार असून २००० नैसर्गिक रोपांची पूर्णनिर्मिती करण्यात येणार असल्याचे वनपरीक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!