नवेगाव पांडव येथे भाजिपाला बियाणे किटचे वाटप.
नागभीड (प्रतिनिधी )
नागभिड तालुक्यातील ग्राम पंचायत नवेगांव पांडव येथे आत्मा अंतर्गत पोषण युक्त सुरक्षित अन्न योजने अंतर्गत गटातील धमहिलांना भाजीपाला बियाणे किट चे वाटप करण्यात आले.
सरपंच अँड. शर्मिला रामटेके ग्रामपंचायत नवेगांव पांडव , कृषी सहायक कु. एन .एम. रामटेके , ने.ही विद्यालय नवेगाव पांडव चे सतीश डांगे सर , प्रशांत राऊत ब्रम्हपुरी, यांच्या हस्ते भाजिपाला बियाणे किट वाटप करण्यात आले.
यावेळी उमेद च्या सौ. सुषमा गोपाल पांडव ( सी.आर.पी), कृषी सखी श्रीमती ममता पेंदाम, ग्रामपंचायत येथील कर्मचारी विजय नवघडे, अतुल पांडव, सोमेश्वर पांडव, रोजगार सेवक, नवेगाव पांडव व मिंथुर येथील लाभार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!