झुंज जीगरबाज स्वच्छ्ता मित्रा ची......

झुंज जीगरबाज स्वच्छ्ता मित्रा ची

मुल (मंगला बोरकुटे) 
गौरव गो शामकुले प्रतिकूल परिस्तिथीमध्ये जीवनामध्ये त्याने लहानपनापासुनच प्रचंड संघर्ष केला आहे. सोमनाथ मंदिर स्वच्छ्ता व वृक्ष संवर्धन कार्यात त्याने स्वतःला झोकून दिले आहे . दिवस असो नाही तर रात्र एकच ध्यास वृक्ष संगोपन एक महिना होऊन गेला पावसाने दडी मारली होती या जीगरबाज कार्यकर्त्याने झाड न सुकू देण्यासाठी प्रचंड मेहनतीने झाडांना पाणी देत आहे. त्याच्या रक्तात निसर्गसेवा मुरलेली आहे. त्याची झाडासाठी असणारी, तळमळ असामान्य आहे.कोणताही स्वार्थ नाही फक्त सेवा निसर्गसेवा करण्याची जिद्द पूर्ण समाजाला प्रेरणा देणारी ही झुंज आहे आपण काय करत आहोत यावर प्रत्येकाला विचार करायला लावणारी प्रेरणा आहे हीआपलीही काही जबाबदारी आहे समाजाविषयी ती आपण ओळखावी आणि शोध विचार वेध (स्वच्छ्ता मित्रा )ला सहकार्य करावे मला येथे संत तुकाराम महाराज यांचा येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नाही याचा अनुभव येत आहे
.या आपण सर्वजण या जीगरबाज कार्यकर्त्याला सहकार्य करू आपल्या परिसरात होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच नियोजन करण्यासाठी उपाय व विविध स्तरावर माहिती गोळा करून उपाय करणे, धेय्य वेडा निसर्गप्रेमी परिसरातील कचरा जंगलात न जाण्यासाठी जनसामान्याला कचराकुंडी मागणारा अवलिया. आम्हाला काही नको कचराकुंडी द्या असं बोलणारा व्यक्ती तालुक्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. जनसामान्या व्यक्तीने दिलेली घमेले ,पावडे, झाडू , कचराकुंडी दान स्वरूपात मागून परिसरातील निस्वार्थ मित्रांसोबत स्वच्छता करीत असतो, आपणही धेय वेड्या स्वच्छता मित्रा टीमला मदत करून हातभार लावू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!