अवैध दारू विक्री जोमात पोलीस प्रशासन कोमात
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर पोलीस ठान्याच्या हद्दितील संपूर्ण आजुबाजुच्या अनेक गावात परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी व मोहफुलाच्या दारूची विक्री केली जाते. कामगार तसेच युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटल्याने अवैध दारूला ग्राहकी चांगलीच डिमांड असल्यामुळे आर्थिक उत्पन्नही माफियांना मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या महिला, कामगार, विद्यार्थी वाहनधारकांना याच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे. महिला व मुलींची छेड काढण्याचा सुध्दा प्रयत्न हे दारुडे करीत असतात. परंतु तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. दारूमुळे घरा - घरात भांडणाचे प्रकार वाढले असून दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार दारूवर खर्च करीत आहेत.चिमूर शहरातील चावडी चौक, वाल्मिक चौक ,केसलापूर, कवडशी , इंदिरा नगर , खातीकामटा या ठिकाणी देशी व मोहफुलाची दारू विक्री करणार्यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक घाबरत आहे.यामुळे अवैध दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.तसेच चिमूरमध्ये काही हॉटेल्स तथा अंडा आम्लेटच्या हातगाड्यांवर रात्री उशिरापर्यंत दारूची विक्री करण्यात येते. दारू विक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप सुद्धा स्थानिक नागरिक करीत आहे. चावडी चौक, वाल्मिक चौक ,केसलापूर, कवडशी , इंदिरा नगर केसलापूर, खातीकामटा या वार्डामधल्या महीलांनी व नागरिकांनी अवैध दारू विक्री थांबविण्यात यावी, यासाठी संबंधित विभागाकडे तोंडी तक्रारी अनेक वेळा दिल्या परंतु याबाबत पाठपुरावादेखील करण्यात आला होता परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!