चिमूर न.प.क्षेत्रातील नळ जोडणी केल्यावरची रस्ते पूर्वरत दुरुस्ती करून देण्यात यावे - माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती अब्दुल कदिरभाई शेख
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद क्षेत्रात नागरिकांना नळ जोडणी दिली जाते. त्यापूर्वी न.प ला अनामत रक्कम जमा करावी लागते. परंतु नळ जोडणी केल्यावर तेथील रस्ते दुरुस्ती करण्यात येत नसल्याने जनतेला त्रास होत असून रस्ते दुरुस्ती करण्याची माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती अब्दुल कदिरभाई शेख यांनी केली आहे. न.प.क्षेत्रात नळ जोडणी करण्यासाठी अनामत रक्कम जमा करावी लागते .रस्ता सिमेंट ,खडीकरण असेल त्या प्रमाणे रक्कम जमा करावी लागते. नळ जोडणी दिल्यावर त्या रस्त्याचे पूर्वरूप करून देणे गरजेचे आवश्यक आहे. परंतु नप प्रशासन एक वेळा नळ जोडणी दिली की तिकडे लक्ष देत नाही.रस्ता पूर्वी सारखा करून देत नाही.त्यामुळे त्या ठिकाणी खड्डे चिखल होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागते. अस्य अवस्थेथ कोनतीही जीवितहानी झाल्यास न.प जबाबदार राहतील करीता नगर परिषद ने नळ जोडणी केल्यावर रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात यावी अन्यथा जमा केलेली रक्कम परत द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा बांधकाम सभपती अब्दुल कदिरभाई शेख यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!