येत्या दि. 11 जुलै रोजी गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे भव्य आयोजन
येत्या दि. 11 जुलै रोजी गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे भव्य आयोजन
गडचिरोली (प्रतिनिधी)
शाअसकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे येत्या दि. 11 जुलै 2022 रोजी (दिवस- सोमवार) दुपारी ११ वाजता, सीओई इमारतीत, जिल्हास्तरीय भव्य पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा
आयोजित करण्यात आलेला आहे . सदर मेळावा सर्व उत्तीर्ण माजी प्रशिक्षणार्थांसाठी असून सर्व व्यवसायाच्या उमेदवारांना यात सहभागी होता येईल. या मेळाव्यात रांजणगाव एमआयडीसी पुणे ,चाकण एमआयडीसी पुणे ,सावंतवाडी पुणे ,वाळूज औरंगाबाद, एमआयडीसी नगर येथील १४ नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच गुजरात येथील मारुती सुझुकी या सुप्रसिद्ध कंपनीचे सुद्धा प्रतिनिधी हजर राहणार आहेत . सदर मेळाव्याचे आयोजन BTRI चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके आणि श्रीमती प्रणाली दहाटे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार चंद्रपूर यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!