वाचनालयासाठी गट विकास अधिकारी यांचे कडून पुस्तक भेट

वाचनालयासाठी गट विकास अधिकारी यांचे कडून पुस्तक भेट

     
नागभीड (यश कायरकर) 
  नागभीड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गिरगांव ग्रामपंचायत येथील वाचनालयासाठी श्रीमती, खोचरे मॅडम, गट विकास अधिकारी, पंचायत समिती नागभीड यांनी पुस्तके भेट दिलीत.
           नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावर  असलेले गिरगांव अंतर्गत येथे ग्रामपंचायत च्या वतीने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे .मुलांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची व गावाची एक ओळख निर्माण करावी, विद्यार्थांनी निवडलेल्या आवडीच्या क्षेत्रात त्यानं यशाची उंचशिखरे गाठता यावी यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने नेहमीच प्रयत्न केले जातात. यासाठी मुलांना कुठल्याही पुस्तकांची अडचण निर्माण होऊ नये व मुलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येईल यासाठी *मा.खोचरे मॅडम* गटविकास अधिकारी नागभीड यांचे कडून ग्रामपंचायत गिरगांव च्या सार्वजनिक वाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आले व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी पण शुभेच्छा देण्यात आल्या,
 याप्रसंगी *मा. खोचरे मॅडम* गटविकास अधिकारी नागभीड, प्रशांत गायकवाड सरपंच गिरगांव, श्री.  शरदजी सोनवाने, उपसरपंच गिरगांव, श्री पी.डी. अलोने,ग्रामविकास अधिकारी गिरगांव व ग्रामपंचायत चे कर्मचारी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!