संवेदनशील नागरीक व सामाजिक संस्था, संघटनांनी पुरपीडितांच्या मदतीसाठी पुढे यावे - हंसराज अहीर यांचे आवाहन
संवेदनशील नागरीक व सामाजिक संस्था, संघटनांनी पुरपीडितांच्या मदतीसाठी पुढे यावे - हंसराज अहीर यांचे आवाहन
शेगाव (जगदीश पेंदाम)
राज्यासह विदर्भात सर्वदूर संततधार पाऊस सुरु असल्याने चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमध्ये बहुतांश नद्यांना महापूर आलेला असून त्या महापुराचा तडाखा चंद्रपूर सह वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, चिमूर, जिवती, वणी व अन्य तालुक्यातील शेकडो गावांना बसला असून नागरिक सर्व गमावून बसले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काही तालुक्यातील गावांना भेट दिली असता या भीषण परिस्थितीचा प्रत्यय आलेला आहे. केवळ अंगावरील कपड्यानिशी घरदार सोडून सुरक्षितस्थळी पोहचले असल्याने समाजातील संवेदनशील व सामाजिक भूमिकेतून कार्य करणाऱ्या लोकांनी, व्यापारी, उद्योजक व अन्य क्षेत्रातील धुरिणांनी या पिडीतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे यावे. त्यांनी घरात अतिरिक्त असलेले कपडे, चादरी, ब्लॅंकेट, लहान मुलांचे कपडे व अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून सामाजिक, राजकीय व इतर यंत्रणांच्या माध्यमातून ही मदत संबंधीतांपर्यंत पोहचविने शक्य होईल असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!