बोरचांदली जवळ नदीच्या पुलाचे वाहतूक धोक्याचे
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
मूल चामोर्शी मार्गावरील बोरचांदली गावाजळच्या उमा नदीवरच्या पुलावरुन वाहतूक करने आता धोक्याचे बनले आहे. या वर्षी सतत पडलेल्या अति वृष्टीमुळे उमा नदीचे पात्र भरून पुलावरुन पाणी जात होत. आता पावसाने थोडासा विसावा दिला असला तरी त्या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे नसल्याने तसेच पाण्यामुळे पुलावर काई (शेवाळ) पसरल्याने वाहतूक करने भीतीचे झाले आहे.
प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पुलाच्या कडेने कठडे लावण्यात यावे या करीता श्री. रूपेशपाटील मारकवार आणि लगतच्या गावक-याची मागणी आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!