अतिवृष्टीमुळे शिरपूर येथिल पडलेल्या घराच्या कुटुंबातील सदस्यांना दिली आर्थिक मदत

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शिरपूर येथे अतिवृष्टीमुळे शिरपूर येथिल भाणारकर तसेच गावतुरे यांच्या पडलेल्या घराच्या कुटुंबातील सदस्यांची चिमूर विधानसभेचे नेते डॉ.सतीश वारजूरकर यांनी भेट घेऊन घटना कशाप्रकारे घडली याबाबत सविस्तर माहिती घेत यामध्ये कसल्याही प्रकारे सुदैवाने जीवित हानी झाली नसून पडलेले घर नव्याने तयार करता येईल पन झालेली जीवित हानी जीव परत येणार नाही.याबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा करीत अनेकजण घरकुल योजनेपासून वंचित असून ड यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांवर चर्चा करून अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरट्यांचा प्रथम विचार करून त्यांना प्रथम लाभ देण्यात येईल असेही यावेळी वारजूरकर यांनी स्वतःचे मत व्यक्त केले. यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे , अध्यक्ष तालुका पर्यावरण विभाग प्रदीपभाऊ तळवेकर ,जिल्हा महासचिव यु.कॉ.गौतम पाटील ,विधानसभा अध्यक्ष यु.कॉ. रोशन ढोक ,विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे , मीडिया प्रमुख पप्पू शेख , तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर व आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!