नागभीड नगर परिषदेमध्ये बोथली वासी यांनी दिला निवेदन
गावातील पाणीपुरवठा पंधरा दिवसापासून ठप्प असल्याने गावकरी महिला पुरुष नगरपरिषद मध्ये.
तळोधी बा.(यश कायरकर)
नागभीड नगर परिषद अंतर्गत बोथली येथील पाईपलाईनचे वाॅल नादुरुस्त असल्याने. गेल्या पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे बोथली येथील रहवाशांनी नागभीड नगरपरिषद येथे निवेदन दिले.
पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याची बाब गावकऱ्यांनी नगर परिषदेतील पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलेली होती. मात्र नगर परिषद याकडे लक्ष देत नसल्याने मी काही करू शकत नाही. असी माहिती कर्मचार्यांनी गावकऱ्यांना दिली.
ग्राम वासियांनी पिण्याच्या पाण्याकरता होणाऱ्या त्रासामुळे ग्रस्त होऊन नागभीड नगरपरिषद चे मुख्य अधिकारी तथा प्रशासक 'राहुल कंकाळ' यांना बोधली ग्रामवासीयांनी 'पाणीपुरवठा तात्पर सुरू करावा या बाबत गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले.
पाणीपुरवठा बंद असल्याने तेथील नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवीत आहेत. विशेष म्हणजे गावातील अनेक बोरवेल नादुरुस्त असून. सूरू असलेल्या बोरवेलच्या पाण्याला ब्लिचिंग पावडर न केल्याने नागरिकांना टायफाईड, डायरिया, अशा अनेक जलजन्य रोगांचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून महिलांना दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याने शेतीच्या कामावर जाण्यास उशीर होत आहे.
याबाबत नागभीड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक 'राहुल कंकाळ' यांना विचारणा केली असता "बोथली येथील पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती मला आज प्राप्त झाली. यापूर्वी मला कुठलीही माहिती कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी दिलेली नाही. मला त्यावेळी माहिती दिली असती तर त्वरित नादुरुस्त पाईपलाईन सुरू करून पाणीपुरवठा सुरू झाला असता. तरीसुद्धा मी आज कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करण्याबद्दल सांगितले आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरता पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करणार असल्याचे सांगित, नागरिकांनी कुठलीही तक्रार नगरपरिषद कार्यालयात किंवा मला प्रत्यक्ष आणून द्यावी."
असे
*राहुल कंकाळ* मुख्यधिकारी नगर परिषद नागभीड, यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!