एक शिक्षक सात वर्ग तरी सगळं ओकेच? उसेगांव जी.प.शाळेचा कारभार चालत आहे एकाच शिक्षकावर...
एक शिक्षक सात वर्ग तरी सगळं ओकेच?
शेगाव.. (जगदीश पेंदाम) एक शिक्षक सात वर्ग तरी सगळं ओकेच?
उसेगांव जी.प.शाळेचा कारभार चालत आहे एकाच शिक्षकावर...
चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या उसेगांव जिल्हा परीषद शाळेचा कारभार एकच शिक्षक चालवीत आहे . त्यामुळे वीद्यार्थ्याचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे..
उसेगांव येथे जिल्हा परीषद शाळेत इयत्ता एक ते सातवी पर्यंत वर्ग आहेत . या सात वर्गाचा कारभार तीन शीक्षक चालवीत आहेत .पण दोन दीवसापासुन दोन शीक्षक काही कारणास्तव सुट्टीवर असल्यामुळे येथे एकाच शिक्षकावर शाळा चालवीण्याची नामुष्की ओढावली आहे .एक शिक्षक सात वर्ग तरी सर्व ओकेच कसे काय सांभाळणार ? आणखी त्यांचा वर्ग कसे घेणार ? त्यामुळे वीद्यार्थ्याच्या अभ्यास क्रमावर मोठा प्रभाव पडत असतानी दीसत आहे..
शाळा व्यवस्थापन समीतीने शिक्षकासाठी ठराव घेतला आहे .सात वर्गापर्यंतची ५० पटसंख्येच्या मानाने येथे शीक्षकाची गरज आहे . येथे अगोदर चार शिक्षक होते एक शिक्षक नीवृत्त झाले असल्यामुळे येथे तीन शिक्षक आहेत, काही कारणास्तव या शाळेतील दोन शिक्षक रजेवर असल्याने येथील जिल्हा परीषद शाळेचा कारभार फक्त एकच शीर्षक चालवीत आहेत त्यामुळे वीद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणीक नुकसान होत आहे त्यामुळे चिमूर पंचायत समीती येथील शिक्षणाधीकाऱ्याने या समस्येची दखल घेऊन शिक्षकांची नीयुक्ती करावी अशी वीद्यार्थ्यांच्या पालकां कडुन मागणी होत आहे....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!