चारगाव बु येथे पावसाने घुसला गोठ्यात वाघ... .... वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी ...

चारगाव बु येथे पावसाने घुसला गोठ्यात वाघ...
 वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी 


शेगाव बू .. जगदीश पेंदाम

वरोरा तालुक्यातील स्थानिक चारगाव बू येथे आज चक्क पावसामूळे वाघ गावात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे... 
सविस्तर असे की आज दुपार पाऊस पासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून गावापासून वाहणारे नदी,नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे दोन वाजता पासून मेघ गर्जना सह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर या मेघ गर्जनेत व भर पाण्यामध्ये गावात वाघ आला तर हा वाघ शेत शीवरातून आला असून  चारगाव, वायगाव रस्त्यावरील संजय लाखे यांच्या जनावराच्या गोठ्यात घुसला असल्याचे गावकऱ्यांनी पाहले असता आरडा ओरड केली असता हा वाघ उडी घेऊन गोठ्यात शिरला व वरती असलेल्या चारा ठेवण्याच्या ठिकाणी तो चडून बसला आहे
तेव्हा वाघ पाहण्यासाठी
गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली असून हा वाघ कधी कुणावर अट्याक करेल याचा काही नेम नाही करिता गावकरी काळजी पूर्वक वाघ पहात आहे...
हा वाघ रेस्क्यू करण्यासाठी ताडोबा बफर टीम तसेच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!