वाघाचा पाठलाग करणे पडले महागात, वाघाने मारला पंजा, युवक गंभीर जखमी.
तळोधी बा.
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी, अंतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रातील, उपक्षेत्र-मेंडकी नियतक्षेत्र - तळोधी खुर्द, या परिसरामध्ये शेतीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांना एक वाघ निदर्शनास आला. मात्र हा वाघाचा एक विकसीत बछडा आहे. त्याची माहिती गावात व आजूबाजूला पसरताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. व त्या बछड्याचा पाठलाग सुरू केला. उपस्थित वन परिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी लोकांना आवडण्याचा व समजवीन्याचा खूप प्रयत्न केला. मात्र वन विभागाची न ऐकता त्या बछड्याचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यामुळे घाबरलेला बछडा कालव्याच्या खाली पुलामध्ये जाऊन घुसला. मात्र तेवढ्यात त्या नहरावरून एक ट्रॅक्टर आला. तेव्हा घाबरलेला बछडा हा पुलातून बाहेर निघाला मात्र पुलाच्या दोन्ही तोंडावर गर्दी करून उभ्या असलेल्या लोकांनी त्याचा रस्ता अडवून धरल्यामुळे चिडलेल्या वाघाच्या बछड्याने जोरदार हल्ला चढविला. यात समोर रस्ता अडवून असलेला युवक श्री अमोल अशोक सोंडवले, जवराबोळी मेंढा, ता.ब्रम्हपुरी, याला वाघाने डोक्यावर पंजा मारून जखमी केले ही घटना सकाळी १०.४५ वाजता घडली.
यावेळी मात्र वन कर्मचाऱ्यांना त्या वाघाच्या छावकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक असताना सुद्धा, जखमीला उचलून दवाखान्यात न्यावे लागले. जखमीला तात्काळ आरमोरी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र त्यांनी तेथून तात्काळ गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
यावेळी श्री एच.डी.शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपुरी, श्री पी.जे.शेंदुरकर क्षेत्र सहाय्यक मेंडकी, कु.एस.डब्ल्यु.ठाकरे वनरक्षक तळोधी खुर्द, श्री बालकृष्ण टेकाम वनरक्षक चिचखेडा, हे उपस्थित होते.
*"सध्या शेतीचा हंगाम असल्यामुळे व या परिसरातील शेती हा जंगलालगत असल्यामुळे शेतकऱ्यांना जंगलातूनच ये-जा करावी लागते,आणि जंगला लागतच काम करावे लागते. त्यामुळे परिसरातील वाघांचे किंवा इतर जंगली प्राण्यांचे दर्शन होणे हे स्वाभाविकच आहे. मात्र जंगली प्राणी दिसताच वन विभागाला कळवण्याऐवजी गावात भ्रमण भ्रमणध्वनीद्वारे माहिती पुरविल्या जाते व नंतर हवसे-गवसे लोक वाघाला पाहण्यासाठी तोबा गर्दी करतात. व 'सेल्फी' काढणे, 'व्हिडिओ' बनवणे याकरिता वाघाचा पाठलाग करत असतात. त्यातून अशा जीवघेण्या घटना घडत असतात. त्यामुळे परिसरातील लोकांनी या संदर्भात माहिती गावात न कळविता आधी वनविभागाला कळवून स्थितीवर नियंत्रण मिळवावे, व स्वतःचे जीवही वाचवावे."*
- वन्यजीव प्रेमी, अध्यक्ष,
'स्वाब' नेचर केअर संस्था.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!