स्वाब'संस्था चे सदस्य यांनी अजगर सापाला जीवदान
तळोधी बा.;
आज सकाळी कन्हाळगांव येथील गावालगतच्या तलावामध्ये मच्छीमारांच्या जाळामध्ये अडकलेल्या साडेसहा फूट लांबीच्या अजगराला पकडून संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू करून वन विभागांमध्ये त्याची नोंद व करून वजन करून, त्याला सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून जिवदान दिले.
यावेळी रेस्क्यू करताना 'स्वाब' संस्थेचे सदस्य विकास बोरकर, महेश बोरकर, हितेश मुंगमोडे, वेदप्रकाश मेश्राम, प्रशांत सहारे, अध्यक्ष यश कायरकर, यांनी हे रेस्क्यु केला.
तर अजगराला सोडते वेळी वन विभागाचे वनरक्षक एस. बी. पेंदाम, रोहित पिद्दुलवार, दीपक बारसागडे हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!