तळोधी बा. वनपरिक्षेत्रात प्रथमच; वाघाच्या हल्ल्यात पाळीव गुरांचा रक्षण करण्याच्या उद्देशाने गुरांच्या पृष्ठभागावर कूत्रीम डोळे चे वेगळेच प्रयोग.

तळोधी बा. वनपरिक्षेत्रात प्रथमच; वाघाच्या हल्ल्यात पाळीव गुरांचा रक्षण करण्याच्या उद्देशाने गुरांच्या पृष्ठभागावर कूत्रीम डोळे चे वेगळेच प्रयोग.
   
 तळोधी बा.:
 
    तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात प्रथमच वाघाच्या हल्ल्यात पाळीव गुरांचा रक्षण करण्याच्या उद्देशाने व मानव-वन्यजीव टाळण्याच्या उद्देशाने प्रथमच करण्यात आले गुरांच्या पृष्ठ भागावर डोळ्याचे प्रतिकृती काढून नवीन प्रयोग. 
    सध्याची मानव-वन्यजीव संघर्ष ची स्थिती चालली आहे.  याचे मुख्य कारण म्हणजे, जंगलालगत असलेल्या शेतीच्या व जंगलामध्ये चरायला जाणारे गुरेढोरे आणि त्यासोबत आपल्या पशुधन त्याच्या संरक्षण करण्याकरता वाघ व मानव यांच्यात होणाऱ्या झटापटी.  यामुळे वाढत चाललेले मानव-वन्यजीव संघर्ष.  हे कशा पद्धतीने टाळून नेता  येईल ?  याकरिता वन विभाग नवनवीन उपक्रम व प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच.
       ब्रम्हपुरी वनविभागातील तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीट येथे सुरू असलेल्या व संपूर्ण विभागात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्ष तथा गावातील वाढत्या पशुधन हानी ला लक्षात ठेवून.  ब्रम्हपुरी वनविभाग तथा भारतील वन्यजीव संस्था, देहरादुन यांच्या संयुक्त विद्यमानाने यास आळा घालण्यासाठी तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत, आलेवाही नियतक्षेत्रात येणाऱ्या जिवनापुर गावातील पाळीव प्राणी (गाय/बैल) यांच्यावर पशुधन मालकाच्या संमतीने प्रयोग केले गेले.
                जंगलातील हिंस्त्र प्राण्यांना पशुधन शिकारीच्या वेळेस गोंधळविण्यासाठी गावातील पाळीव प्राणी (गाय / बैल) यांच्या मागील भागावर चित्राकृती डोळे काढण्यात आले. 
                पृष्ठभागावर कूत्रीम डोळे प्रयोग. हे सदर प्रयोग हे प्रयत्नशीलरित्या यशस्वी होणार यांची वरिष्ठांना आशा आहे.
                यावेळी तळोदी वनपरिक्षेत्रातील परिक्षेत्र अधिकारी  कैलास  धोंडणे,  ब्रह्मपुरी वनविभागाचे बायोलॉजिस्ट राकेश अहुजा,  निलंजन बासू वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आफ इंडिया,  वनरक्षक एस बी पेंदाम, पि‌.आर.टि. चे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!