कोलारी येथे सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिक .....
शंकरपुर.... जगदीश पेंदाम
येथून जवळच असलेल्या कोलारी गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चिमूर अंतर्गत डोमा- शंकरपुर प्रभागातील कोलारी येथे सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक घेण्यात आला असुन यावेळी जीवामृत,दशपर्णी अर्क, दहि अर्क( सेंद्रिय युरिया),जैविक बोरॉन तयार करण्यात आले. व शेतकऱ्यांना विषमुक्त शेती व उत्पादन खर्च कमी कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले..
तसेच समूहातील महिलांचा लोकल ग्रुप तयार करण्यात आला. तसेच महाजीवीका अभियानांतर्गत स्वयं सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादने विक्रीसाठी गावात आठवडी बाजार (रुरल हॉट) भरविण्याचे निश्चिती करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्राम संघ पदाधिकारी,गावचे सरपंच अलोने ग्रामसचिव भसारकर ,कृषी सहायक मॅडम, तालुका व्यवस्थापक राजेश बारसागडे , प्रभाग समन्वयक ईश्वर मेश्राम, सेंद्रिय प्रभाग समन्वयक सुधिर ठेंगरी,कृषी सखी गजभिये, डोईजडे, समुदाय संसाधन व्यक्ती काटेकर, पशूसखी जांभुळे, व ग्राम संघ सदस्य समूहातील महिला, शेतकरी यावेळी उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!