सेवा सहकारी संस्थेचा विजय .... वीस वर्ष बालेकिल्ला असलेला संस्थेवर विरोधकांनी मारली बाजी...
सेवा सहकारी संस्थेचा विजय ....
शंकरपुर....जगदीश पेंदाम
येथून जवळच असलेल्या जवराबोडी येते असलेल्या सेवा सहकारी संस्थेवर गावातील दोन गटांमध्ये निवडणूक घेण्यात आले यामध्ये नानाजी राऊत विरुद्ध कमलाकर ठाकरे अशी पॅनल निवडणूक लावण्यात आली..
कमलाकर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी 9 ही उमेदवारांनी वर्चस्व निर्माण करत विजय मिळवता आला आहे. सतत 20 वर्ष राऊत यांनी आपले वर्चस्व निर्माण करत सेवा सहकारी संस्थेवर बाजी मारली होती, परंतु यावेळी मात्र त्यांना बालेकिल्ल्यावर निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळवता आलेला नाही, यामध्ये निवडणुकीमध्ये उभे असलेल्या 9 ही उमेदवारांनी विरोधी गटाने बाजी मारत विजय निर्माण केले...
सेवा सहकारी संस्थेचे निवडून आलेले उमेदवार श्रीकृष्ण शिवा गजघाटे 42 मते, आशिष अशोक ठाकरे 44 मते, दिलीप मारुती ठाकरे 45 मते, सर्जेराव लक्ष्मण ठाकरे 43मते,योगेश नथू माळवे41मते, मधुकर लक्ष्मण राऊत 44मते,गौतम हरिराम राहुडकर46मते, दिलीप भैय्या ठाकरे 46मते,रामेश्वर उंदरु चौधरी44 मते घेऊन 9 उमेदवार यांनी काँग्रेस समर्थक गटाच्या मोठ्या प्रमाणात धुवा उडवत विजय मिळविला, निवडून आलेल्या सर्व गावातील नागरिकांकडून गावांमध्ये मिरवणूक काढत सर्व विजयी उमेदवाराचे स्वागत करण्यात आले...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!