विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कोसराच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १३ पैकी ९ जागांवर मिळविला दनदनीत विजय
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे २ एप्रिल् २०२२ रोजी पार पडलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत १३ पैकी ९ जागांवर भारतीय जनता पार्टीने दनदणीत विजय मिळवीला.
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून धनराजजी गभणे, संजयजी रत्नपारखी, जयकुमारजी पारधी, आनंदरावजी जिभकाटे, सचिनजी उपरीकर, अनिलजी कामथे, प्रभाकरजी हटवार, सुरेशजी फुले आणी सौ.सीताबाई नांदेकर यांनी विजय मिळवला.
तर या निवडणुकीकरिता भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लोकेश गभणे, कोसऱ्याचे सरपंच सुरेशजी कुर्झेकर,माजी पंचायत समिती सदस्य सौ.कल्पनाताई गभणे, उपासरपंचा सौ.ललिताताई उपरीकर,राजूजी जिभकाटे, नितीनजी उपरीकर, रामभाऊजी नांदेकर, बालुभाऊ जिभकाटे, काशीरामजी बिलवणे,मनोज हटवार, श्रीकृष्ण राऊत, केवलराम शेंडे, नेपाल देशमुख,रामभाऊ गभणे,अमोल जिभकाटे, रामकृष्णाजी जिभकाटे, रामदासजी कावळे, भाऊरावजी रामटेके, जिवनजी गभणे, अभिषेक रत्नपारखी, विकास जिभकाटे, निखिल शेंडे, खेमराज वलके यश पारधी यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!