केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरोधात चिमूर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे आंदोलन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - मोदी सरकारने जिवणावश्यक वस्तु , पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर वाढविल्याने नागरिकांचा बजेट बिघडला आहे. इंधन दरवाढीच्या नावाखाली जनतेची लुटमार होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव साहिश वारजूकर व चिमूर तालुका काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष संजय घुटके यांच्या नेत्तृत्वात मोदी सरकार च्या महागाई धोरण विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन सोमवारला माजी आमदार डॉ.अविनाश राजूरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून तहसील कार्यालय पर्यंत सायकल व हातात मोटार सायकल घेवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत रॅली काढण्यात आली व तहसिल कार्यालयाच्या समोर चुल पेटवून पान्याची फोडणी देत मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी चिमूर येथील शहर काँग्रेस चे अविनाश अगडे, रहेमान पठाण, राजू चौधरी , दिपक कुंभारे, विजय लोहकरे, नागेंद्र चट्टे, पप्पु शेख, विलास मोहिणकर , अमोल जुनघरे , मंगेश घ्यार, प्रविण जिवतोडे, सुभाष बनसोड, बाळू बोभाटे, सुनील भजभूजे ,नाजमा शेख, प्रिती दिडमुठे राणी थुटे,कल्पना इंदूरकर अन्सारी सह आदी पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!