येणोली माल येथील लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर यांनी केला अंगणवाडी सेविकेचा सत्कार
तळोधी बा.;
आज दि 31/03/2022 ला ग्रा. पं. येणोली येथे निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करन्यात आला. मूर्ती इंदूताई सोनवाणे येणोली ,
जनबंधु ताई धामणगाव चक, दुबे ताई धामणगाव माल व नांदेड प्रा आरोग्य केंद्र चे डॉ नाडमवर साहेब व आरोग्य सेविका सिडाम म्याडम यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आले.
व येणोली ग्रा. प. अंतर्गत येणारे येणोली माल, धामणगाव चक, धामणगाव माल, येथील अपंग कल्याण योजने अंतर्गत 16 लाभार्थी यांना साहित्य वाटप करण्यात आले.
सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गीरडकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून येनोली माल चे सरपंच अमोल बावनकर ,
सोनापूर च्या सरपंच शीला ताई ठोंबरे , ग्रामसेवक सूरज पिसे, हे होते.
संपूर्ण अंगणवाडी सेविका व मदतनीस ,आशावरकर ,सी आर पी ,व ग्रा प कर्मचारी व येणोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित संगणक परिचालक विजय सोनवाणे यांनी केले व आभार प्रदर्शन अरविंद दडमल यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!