परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात नवोदय विदयालय तळोधी बा.च्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात नवोदय विदयालय तळोधी बा.च्या  विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग 

तळोधी बाः
     विद्यार्थ्यांचा परीक्षा बद्दल तनाव दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंन्द मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांकडून विचारलेल्या प्रश्नांना आपल्या संवाद व्दारे सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व यावेळी देशभरातील केंद्रीय विदयालय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परीक्षा तनाव पासून मुक्त कसे व्हायला पाहिजे याचा मार्ग सुचविण्याचा सल्ला दिला.
         यावेळी जवाहर नवोदय विदयालय तळोधी बा.येथील सभागृहात  पंतप्रधान नरेंन्द मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या संवादचे डिडी नँशनल, डीडी न्युज व फेसबुक या प्रसारमाध्यमाव्दारे प्रसारण करण्यात आले.
    देशभरातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचे टाळ्यांचा गजरात स्वागत केले . यावेळी या कार्यक्रमात विश्व ज्योती कांँन्वहेट स्कुल येथील विद्यार्थी शिक्षक यांनी आस्वाद घेतला .
      नवोदय विदयालयाचे प्राचार्य मीना मनी यांनी कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांचे शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक वर्ग यांनी आभार व्यक्त केला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!