लोकांना भारतीय संविधाना प्रती शिक्षित करणे गरजेचे: बिएस-फोर" :-
बल्लारपूर प्रतिनिधी
भारतीय संविधान देशातील १००% लोकांसाठी असुन सर्वांचे जन्मापासुन तर अंतीम संस्कारांच्या पर्यंत अधिकार सुरक्षित आहेत.त्याची लोकांना जाणिव करून देने BS-4 या राष्ट्रीय अभियानाचा उद्देश्य आहे. शाशनकर्ते भारतीय संविधानाची शपथ तर घेतात परंतु त्यालाच बायपास करून आपल्या हिताचे कायदे केले त्यामुळे देशात गरिब अधिक गरिब तर श्रीमंतांच्या हातात सत्ता आहे. कायदे मंडळ, कार्यपालिका,न्यायपालीका हे भारतीय संविधाना चे स्तंभ प्रतिनिधिक नसल्याने या विषमतेचा लोकशाहीला मोठा धोका असल्याचे वक्त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत समाज मंदिर,नलफडी ता. राजुरा येथे दि.३०/३/२२ ला सायं.संपन्न बिएस-फोर (भारतीय संविधान, सन्मान,सुरक्षा,संवंर्धन) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.कविता मडावी, मा.रा.उपा.बामसेफ होत्या.तर वक्ते मा.एम.टी.साव मा.जि.के.उपरे,माजी मानद सचिव सिडीसिसी बॅंक,चंद्रपुर, होते. या प्रसगी मा.संघा साव,मा.वनिता सुटे-भसारकर,मा.लिलाबाई नगराळे,तर अमित टेकाम,सरपंच, मा.प्रभाकर धानोरकर , उपसरपंच,मा.राजु कोंडापे,अध्यक्ष तंटामुक्ती,मा.बाबाराव धोटे,माधुरी देवगडे, मा.मंगला धानोरकर, मा.आशा खोब्रागडे, मा.मुनेश्वर पाकुलवार,व मा.सुरज उरकुडे इ. मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक मा.दिवाकर मडावी,यांनी केले. संचलन व आभार व्यक्त मा.डाॅ.अनिल पी.चांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मा.नलफडी निवासींनी प्रयत्न केले.(डाॅ.अनिल पी.चांदेकर,नलफडी.)*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!