मुल येथे भाजप स्थापना दिवस साजरा
प्रतिनिधी:- कुमुद भोयर मूल
आज जगभरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना साजरा करण्यात येत आहे, मुल येथील भाजप कार्यालयात सुद्धा आज एकत्रित येत, ध्वजारोहण करून , कार्यकर्त्यांना मिठाई वाटप करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला, भाजप मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, मा नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, शहर महामंत्री अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्ट्नकर, मा नगरसेवक प्रशांत समर्थ, मिलिंद खोब्रागडे, अनिल साखरकर, विनोद सिडाम, भाजप कार्यकर्ते गुरुदास भेंडारे, प्रवीण मोहूर्ले, प्रशांत बोबाटे, दादाजी येरणे, राकेश ठाकरे,प्रमोद कोकुलवार, अभिजीत पूरम, अशोक वाकडे,राकेश समर्थ,जितू टिनगुसले, मंगेश एडलावार, संजय कोडापे, अक्षय गजापुरे यांची विशेष उपस्थिती होती, या प्रसंगी भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते सुशीला आयलनवार, मायाबाई चौखुंडे, गोविंदजी आदे, कृष्णाजी मलोडे, सुधीरजी नागोशे, बब्बू भाई शेख, पांडुजी गेडाम, कवडुजी कोल्हे, दयाबाई महाडोळे यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला, ध्वजारोहण नंतर वंदेमातरम गीत, राष्ट्रगीत घेण्यात आले , भारत माता की जय, वंदेमातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अश्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!