तळोधी बा येथे रामायण कथा सोहळ्याला सुरुवात.

तळोधी बा येथे रामायण कथा सोहळ्याला सुरुवात.

  तळोधी बा. (यश कायरकर) 
       अप्पर तहसील असलेल्या तळोधी बा. नगरात  रामायण कथा सोहळ्याला सुरुवात झाली. 
       प. बाळकृष्ण सुरासे महाराज कोपरगाव शिर्डी यांच्या वाणीतून रामायान कथेला सुरुवात झाली.

            महादेव मंदिर तळोधी बा. च्या भव्य पटांगणात या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते७:३० वाजता गावातून रामधून काढली जाते,  त्यानंतर आठ वाजता आरती व सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत रामकथा सांगीतली जाते.   
   या नंतर  १० एप्रिल ला गावातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. व ११ एप्रिल ला गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    या रामायण कथेचे आयोजन विश्व हिंदू परिषद,  श्रीराम शोभायात्रा समिती,  गुरूदेव सेवा मंडळ, गायत्री परीवार,  गावातील सर्व गणेश, शारदा, दुर्गा व शिवपार्वती मंडळ, भागवत सप्ताह समिती, नरेंद्र महाराज संप्रदाय व भारतीय गो रक्षण व गोशाळा संस्था तळोधी बा. यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!