सरकारी कर्मचारी झाला निरक्षर

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसिल हि नावाजलेली तहसिल म्हणून ओळखली जाते.जिल्ह्यातील सर्वांत मोठा क्षेत्रफळ असलेला हा तालुका आहे.या तालुक्यात ७ सर्कल आहे.महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका व उपविभाग शाखा चिमूर जिल्हा चंद्रपूर दिनांक.०४/०४/२०२२ पासून बेमुदत काम बंद आंदोलनास बसले असून हे काम बंद आंदोलन जनतेची दिशाभूल करणारे ठरत आहे.३० कि.मी. अंतर गाठून चिमूर तहसिल ला शासकीय कामाकरिता कडाक्याच्या उन्हाळ्यात आलेले लाभार्थी हे आल्या पाऊली मागण्यांचे फलक नसलेल्या उपोषणस्थळी अधिकारी यांची भेट घेऊन परत जात असतात.यामुळे जनतेची पूर्णपणे अधिकारी यांचेकडून फसवणूक करून दिशाभूल झाल्यागत दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी यांचेसुद्धा या उपोषणाकडे लक्ष नाही.आंदोलन कुठलाही असो मागण्या असणारच परंतु जनतेला त्या मागण्या कोणत्या याचे फलकच जर दिसणार नाही यास आंदोलन तरी कुठले म्हणावे ? यामुळे गोरगरीब व्यक्ती दिवसभराची रोजी टाकून शासकीय कामाची आस ठेवून येत असतो परंतु नाईलाजाने त्यांना नैराश्य बाळगून कामाविना परत जावे लागत आहे.याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत राहिल तर जनता या अधिकाऱ्यांना काय संबोधेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!