दत्तक गांव चिखलापार येथे रस्ता व गुरुदेव सेवा मंडळाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमसमनव्यक चिमूर विधानसभा डॉ.सतीशभाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - कळमगांव ग्राम पंचायत अंतर्गत येणारा  चिखलापार हे चिमूर पासून ५ किलोमीटर असून  हे २०० लोकसंख्या असले एक गांव विकासापासून कोसो  दूर आहे या गावाच्या सभोवताल नदी असल्याने नदी भरल्याने गावात पाणी घुसतो त्याचा धोका यांना दरवर्षी  बसतो व गावाबाहेर निघणे कठीण असते मागील चार वर्षां अगोदर  नदी भरगच्च पाण्याने भरून वाहत होती व गावात पाणी घुसल्याने गावातील नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते अशा परिस्थितीत गावातील लोकांची चिमूर येथील शेतकरी भवन येथे त्यांची राहण्यासाठी सोय केली त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी यांनी गावकऱ्यांची भेट घेतली अनेक आश्वाशने दिली. परंतु अजून कुठल्याही अडचणी लोकप्रतिनिधी कडून पूर्ण झाले नाही  मात्र काही  दिवसांपूर्वी  गुरुदेव सेवा मंडळ चिखलापार येथे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपुर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीश वारजूकर,हे चिखलापार येथे गेले असता त्यांनी आपल्या मार्गदशनात बोलतांना सांगितलं की तुमच्या गावातील कुठल्याही अडचणी त्या मग सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक असो मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असे डॉ. सतीश वारजूरकर बोलतांना सांगितले होते त्या वेळी गावकऱ्यांनी आम्हाला पावसाळ्यात गावात येण्यासाठी  रस्ता नाही आम्हाला रस्ता करून घ्या त्यावर एक महिन्यात तुम्हाला रस्ता बांधकामासाठी निधी आणून ते काम लवकरच सुरू करू असे सांगितले व दि. ३०/०३/२०२२ ला रस्त्याचा कामाचे भूमिपूजन डॉ.सतिश वारजूकर यांच्या उपस्थितीत  संपन्न  झाले या वेळी,ग्राम पंचायत सरपंच सुमित्राताई गोहणे,ग्राम पंचायत उपसरपंच किसनजी कापसे,ग्राम पंचायत सदस्य सरिताताई काळे , छायाताई पसारे,माजी सरपंच सावरगांव देवानंदजी गावंडे,पटवारी साहेब प्रविनजी ठोंबरे, माजी सरपंच संतोषजी डांगे,गणेश चौधरी, किशोरजी नागदेवते, रमेश झाडे,संजय कापसे,अमोल कापसे,वैभव कापसे, नरेश कापसे,अजय झोडापे, योगेश कापसे,अनुज गेडाम,विलास कापसे,अमित झोडापे,प्रभाकरजी निखारे,व गावकरी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!