शेतकरी युवकाने स्वतःच्याच शेतात गळपास लावून केली आत्महत्या
वडाळा (पैकु) टेकाळी रिट येथील घटना
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - नगरपरिषद हद्दीतील शेतकरी युवकांने आपल्याच शेतातील निंबाच्या झाडाला आत्महत्या केल्याची घटना टेकाळी रिट येथे बुधवार ला सकाळी उघडकीस आली मृतक युवकाचे नाव सूरज उर्फ सचिन गुलाब सावसाकडे वय 28 वर्ष रा. वडाळा (पैकु) येथील आहे. वडील आणी मृतक युवक दोघेही मिळून स्वताची शेती करत होते गुलाब सावसाकडे यांना सुरज हा एकुलता एक मुलगा होता यावर्षी पिका पानी बरोबर असले तरी शेतीचे कर्ज असल्याने युवकाने गळपास लावून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मुलाने आत्महत्या केल्याने सावसाकडे कुंटूबावर आभाळ कोसळले आहे. पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला असुन मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड करीत आहे .मात्र युवकाचे मृत्यू चे कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!