मूल येथे काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी

मूल येथे काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी

मूल (अमित राऊत)

मुल येथील जनसंपर्क कार्यालय येथे काँग्रेस पक्षाची  डिजिटल सदस्य नोंदणी  सभा  आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख अतिथी माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिकर, रुपालीताई संतोषवार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश पाटील मारकवार  यांनी मुल तालुक्यातील जास्तीत जास्त डिजिटल नोंदणी करावी असे आवाहन  केले. उपस्थित अतिथीनी मार्गदर्शन करत काँग्रेस पक्षाचे महत्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला अरुण झुरमुरे, भुजंग चलाख, अविनाश मोहुलै, आदर्श रायपुरे, सोनु भडके, मोहन शांतलवाऱ, अविनाश चिंचोलकर, किसन गुरणुले, शंकर सिडाम , साईनाथ गेडेकर, श्रीनिवास टिकले, योगेश चापडे, अंबादास चलाख, विजय बोलीवार, सुनील दुपारे, हंसराज मेश्राम, अमोल भालमवार , पुरषोत्तम वाडके, उमेश इनमवार,  नरेंद्र चौधरी, एकनाथ पेंदोर, मारोती वेलके, निलेश धोटे, भुपेश दुर्गे, उमेश सातपुते, कृष्णा आदे , सचिन भांदकर , इत्यादी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!