विकासाची वाट बघत आहे शंकरपूर परिसर गावे

विकासाची वाट बघत आहे शंकरपूर परिसर गावे
 
शंकरपूर....जगदीश पेंदाम

शंकरपूर हे गाव जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेली आहे मात्र आजही पाहिजे त्या प्रमाणात या गावाचा  व परिसरातील गावांचा विकास झालेला दिसून येत नसून गावाच्या  परिसरात जवळपास 30 गावे येतात गावातील लोकसंख्या 10 हजारचा वर असून परिसरातील लोकसंख्या 50000 च्या जवळपास आहे गेल्या 30 वर्षामध्ये या परिसरातील जनतेनी अनेक राजकीय व्यक्ती निवडून देली मात्र आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास झालेला नसून विद्यमान आमदार आणि खासदार यांचे सुद्धा  या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.....
  
क्रांतिभूमी, विधानसभा क्षेत्रात चिमूर अंतर्गत नेरी,खडसंगी, भिसी, शंकरपूर ही मोठी लोकसंख्या असलेले गावी आहे
त्यामध्ये भिसीला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला,तसेच अप्पर तालुका तालुक्याचा दर्जा मिळाला आणि नुसताच काही दिवसांमध्ये नेरीला नगरपंचायत निविदा काढण्यात आली आहे... 
  
परंतु चिमूर विधानसभा क्षेत्रमध्ये शंकरपूर गावात अजून पर्यंत कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक, तसेच कोणत्याही बँकेचे एटीएम नसल्यामुळे पैसे काढण्याकरिता विद्यार्थी, पेन्शन धारक कर्मचारी, कर्मचारी,व्यापारी वर्ग यांना इमर्जन्सी मध्ये आजही चिमुर,नागभीड, भूयार, भिवापूर, बाहेरगावी पैसे काढण्यासाठी सामान्य जनतेला शेतकरी यांना बँकेत जावे लागते तसेच या ठिकाणी जाण्यासाठी कोणते प्रकारचे वेळेवर वाहन नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो,क्षेत्रात लोकसंख्या, विकासाच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा विचार केला तर इथे ग्रामीण रुग्णालयाची तसेच पोलीस स्टेशनची, तालुका मागणी अनेक वर्षापासून राजकीय वादातून स्वप्न भंग पडलेली आहे.....
तसेच शंकरपूर मध्ये पूर्वीपासून pwd चे कॉटर व मोकळी दोन हेक्टर वर जागा उपलब्ध आहे याठिकाणी जूनियर इंजीनियर पूर्वी राहत होते परंतु आज ही कॉटर बेवारस पडलेली असून जीर्णावस्थेत आहेत या कॉटरला आजही  j e कधी मिळणार याकडे येतील जनता आतापर्यंत वाट बघत आहे..
 परिसरातील सुशिक्षित बेरोजगारीची समस्या खूप भेडसावत आहे गावालगत आजगाव, पाचगाव,खैरी, पांजरेपार,कोल्हारी,कानपा मिळून काही वर्ष अगोदर महाजनको च्या पावर प्लांटला मंजुरी मिळाली असल्याचे लोकप्रतिनिधी कडून सांगण्यात आले आणि तो तयार होणारच असा विश्वास देण्यात आले होता मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही अपेक्षा धुळीस मिळाली व परिसरातील जनतेची घोर निराशा झाली, तसेच, जुन्या मागणी असलेल्या  चिमूर, कानपा,वरोरा रेल्वे मार्ग होणार असे आश्वासन परिसरातील जनतेला दिले होते परंतु आतापर्यंत ही सुद्धा अपेक्षा धुळीस मिळाली आहे..
या परिसरामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून परिसरामध्ये धान, कापूस, सोयाबीन,मिरची, तुर पिके घेतली जातात या ठिकाणी अजून  शेतकऱ्यांना मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती नाही, शेतकऱ्याची करोडो रुपयाची हिरवी मिरची दिल्ली, भोपाल, मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी ठिकाणी जाते परंतु शंकरपूर या ठिकाणी अशी कुठलीही मोठी बाजारपेठ उपलब्ध नाही, शेतकऱ्यांना 
मोखेबर्डी, गोसीखुर्द सिंचन सुविधा अजून पर्यंत परिपूर्ण प्रमाणात मिळाले नाही, परिसरातील ग्रामीण भागामध्ये अजून पर्यंत बसेसची सुविधा नाही, कवडसी देश,दहेगाव झरी,चक जाटेपार रस्ता नाही, या ठिकाणी वन विभागाच्या कार्यालयामध्ये परिसरातील गावांमध्ये मयत व्यक्तीला अंत्यविधी करण्याकरता जलाऊ लकडा उपलब्ध नाही, बेरोजगार मुलांना तसेच शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध नाही,परिसरातील बेरोजगार युवकांचे रोजगाराकरिता नागपूर, पुणे, गुजरात,नाशिक काम करण्याकरता जावे लागत आहे या सर्व विकासाकडे जनता आतुरतेने वाट बघत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!