शहीद विर बाबुराव सेडमाके जयंती आणि बिएस-४अभियान संपन्न
लोहारा दि.१२/३/२२ला
लोहारा येथे शहीद विर बाबुराव सेडमाके यांच्या जयंती निमित्याने लोहारा येथे *मा.गंगुताई मडावी, माजि सभापती पंचायत समिती,चंद्रपूर, मा.किरणताई चालकुरे, सरपंच लोहारा* *मा.शालिक मरस्कोले, उपसरपंच लोहारा, मामनोहर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत बिएस-४,(भारतीय संविधान,सन्मान,सुरक्षा संवर्धन) BS-4 अभियानातील कार्यकर्ते मा.कविता मडावी,राज्य उपाध्यक्ष,बामसेफ, मा.हरिष सहारे, मा.दिवाकर मडावी, मा.देवानंद रायपुरे, मा.पंकज जांगडेकर, मा.बिंबिसार बरके,इ. उपस्थित होते.*
*मिरवणुकी नंतर मा.किरणताई चालकुरे सरपंच लोहारा यांच्या अध्यक्षते खाली संपन्न सभेत वरिल वक्त्यांनी मार्गदर्शन केले.*
*तर मा.कविता मडावी यांनी शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा संघर्ष आणि आदिवासींची वर्तमान स्थितीवर भाष्य करताना भारतीय संविधान सुरक्षित राहिल्या शिवाय आमचे मूलनिवासी समाजाचे अधिकार सुरक्षित राहणार नसल्याचे सांगितले. वर्तमान भारतीय संविधानातील सुचि पाच-सहा सुचिवर भाष्यात पेक्षा व फलश्रुती वरही मार्गदर्शन केले.या साठी भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा,संवर्धन म्हणजेच (बिएस-फोर,BS-4) भारतीय संविधानाचे जतन होण्याची गरज प्रतिपादीत केली.साव सर.फोटो मा.बिंबिसार बारके.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!