माजी आमदार डॉ.अविनाश वारजूरकर यांचा वाढदिवस मूक - बधिर विद्यार्थ्यांना गणवेश तसेच खाऊचे वाटप करून केला साजरा
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दि.१४ मार्च २०२२ रोजी चिमूर शहर काँग्रेस च्या वतीने डॉ.अविनाश वारजुकर माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ, माजी आमदार चिमूर विधानसभा तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटी यांचा वाढदिवस मा.संजय घुटके अध्यक्ष तालुका कांग्रेस चिमुर, विजय पाटील गावंडे, तालुका कार्याध्यक्ष, तसेच अविनाशजी अगडे,शहर अध्यक्ष चिमूर यांचे उपस्थित राष्ट्रसंत तुकडोजी मूक - बधिर विधालय वडाळा (पैकू) येथील विद्यार्थ्यांना गणवेश तसेच खाऊ व केक कापून पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.या छोटेखानी सभेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना डॉ.अविनाश वारजुकर म्हणाले आपला पक्ष खूप मजबूत आहे आपल्या पक्षाची विचारधारा ही सर्वसमावेशक आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते यांनी सर्व समावेशक विचारधारा स्विकृत केली आहे.परंतु आपल्या पक्षाला रसातळाला नेणारी काही मंडळी पक्षात आहेत काही कार्यकर्ते चापलूसी लावणारे आहे. आणि नेते त्यांच्या चापलूसी ऎकणारे आहे यामुळे पक्षात इमाने इतबारे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काम करतांना संघर्ष करावा लागतो.ते पुढे म्हणाले कांग्रेस ला कांग्रेसचेच मंडळी हारविन्याचे काम करीत असतात. त्यामुळे विषमता वादी पक्ष याचा फायदा घेऊन हिंदू आणि मुस्लिम असा द्वेष समाजात निर्माण करून मताची विभागणी करून सत्तेवर येतात नवीन पिढी त्यांच्या विषमतावादी विचारला बळी पडून विषमतावादी विचार असलेल्या पक्षाला सत्तेवर बसवितात.यातून त्यांच्या संबोधनातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एक बोध घेण्यासारखा आहे पक्षासाठी काम करताना पक्षाची विचारधारा जी आपल्याला पक्षाची एकनिष्ठ ते साठी प्रेरित करीत आहे त्या विचारधारेशी सुसंगत राहून चापलूसी करणारे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना वेळीच बाजूला सारून सामान्य लोकांपर्यंत आपल्या पक्षाचे विचार आणि सत्तर वर्षात संविधानाशी निगडित राहून देशातील लोंकाची केलेली कामे याची प्रसिद्धी करून आपला भटकलेला मतदार आपल्या पक्षाकडे वळविणे.विचारधारा मरत नसते या पदाधिकारी आणि कार्यकर्ते कडून दुसऱ्या पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांच्या कडे दर पिढी दर जात असते परंतु परंतु विचारधारेशी बेईमानी करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकरण करणाऱ्या मंडळी कडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे.असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संचालन विजय डाबरे सचिव तालुका कांग्रेस यांनी केले आणि आभार प्रदर्शन विलास पिसे नेरी शिरपूर जि.प.सर्कल अध्यक्ष यांनी केले.यावेळी तालुका अध्यक्ष पर्यावरण विभागाचे प्रदीप तळवेकर, मा. गटनेते तथा नगर सेवक कदिर चाचा जेष्ठ प्रमुख धनराजजी मालके, महिला कांग्रेसच्या जेष्ठ सौ. लताताई अगडे, तालुका अध्यक्षा सविताताई चौधरी,शहर अध्यक्ष रानीताई थुटे, वनिता मगरे, गीताताई रानडे दिक्षाताई भगत वैशाली शेंडे,दीपक कुंभारे, विजय लोहकरे , ओमजी खैरे, विजुभाऊ डाबरे, विलास मोहिणकर तालुका सरचिटणीस , जिल्हा महासचिव गौतम पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे ,नितीन कटारे, तुषार शिंदे , प्रवीण जीवतोडे, संदीप कावरे, देविदास मोहिणकर, सुभाष बन्सोड, आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!