बोलीतील संवाद हृदयाला स्पर्श करून जाते - डॉ. प्रा. सुदर्शन प्राथमिक शिक्षणात बोलीभाषेचे महत्व या परिसंवादात मान्यवरांनी मांडले चिंतन

बोलीतील संवाद  हृदयाला स्पर्श करून जाते - डॉ. प्रा. सुदर्शन 
  प्राथमिक शिक्षणात  बोलीभाषेचे महत्व या परिसंवादात मान्यवरांनी मांडले चिंतन

  जुनासुर्ला जि. चंद्रपूर
(प्रतिनिधी)  -    
   २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला येथे विविध विषयावर चिंतन विचार प्रकटन द्वारे पार पडले.
प्राथमिक शिक्षणात बोलीभाषेचे महत्त्व या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ. सुदर्शन दिवसे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी , चामोर्शी येथील प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले  सहभागी झाले होते. 
याप्रसंगी डाँ.चौथाले म्हणाले की, 
 पहिल्यांदाच प्राथमिक शिक्षणातील अडसर ठरत असलेल्या समस्येवर परिसंवादाचे आयोजन करणे ही  झाडीबोलीच्या चळवळीचे मोठेपण दिसून येते .प्राथमिक शिक्षण घेणा-या बालकावर जन्मापासून मातृबोलीभाषेंचा प्रभाव आढळतो व शिक्षणाच्या प्रवाहात आल्यावर प्रमाणभाषेचा होणारा मारा,यामुळे त्यांचेतील  निरागसता संपते की काय असे वाटायला लागते. बोलीचा प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे , असे ते म्हणाले.
 
सिनेट सदस्य सुनिल शेरकी यांनी  प्राथमिक शिक्षणातील बोलीच्या संदर्भाचा अहवाल देत बोली  टिकविण्याचे जबरदस्त आव्हान व प्रयत्न तेवढ्याच ताकदीने झाले पाहिजे. बोली ही माय आहे.माय मराठीतील तीचं स्थान भाषा इतिहासात अतिशय मोलाचे आहे असे ते म्हणाले.
       डाँ. सुदर्शन दिवसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विषयानुरूप  उदाहरणे देत  बोलीचं महत्व  पटवून दिले.  म.गांधीनी सुध्दा  बोलीभाषेतील  शिक्षणाला महत्त्वाचे मानले होते. जपान,चीन सारख्या  राष्ट्रांनी जे प्राथमिक शिक्षणात जे  बोलीला महत्वाचे स्थान दिले आहे,यावर विचार करावा लागेल. कारण बोलीतला संवाद हृदयाला स्पर्श करून जातो, असे ते म्हणाले.
   तर या महत्त्वाच्या परिसंवादाचे सूत्रसंचालन पंडीत लोंढे  यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोषकुमार उईके  यांनी केले. परिसंवादात संमेलनाचे अध्यक्ष डॉ मनोहर नरांजे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, लखनसिंह कटरे, डॉ. राजन जयस्वाल, ना.गो.थुटे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडी बोलीचे जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, मिलिंद रंगारी, स्वागताध्यक्ष रंजीत समर्थ , कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे, शाखाध्यक्ष लक्ष्मण खोबरागडे, डॉ. विशाखा कांबळे, दिवाकर मोरस्कर, भारती तितरे, सुनील पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!