जुनासुर्ला येथील झाडीबोली साहित्य संमेलनात गाजली बायांचे लोकगीते.

जुनासुर्ला येथील झाडीबोली साहित्य संमेलनात गाजली बायांचे लोकगीते.


मा.सा. कन्नमवार साहित्य नगरी 
जुना सुर्ला परिसर ता. मुल


        जुनासुर्ला येथे सुरू असलेल्या २९ व्या झाडीबोली संमेलनाच्या चौथ्या  टप्प्यात अरूणा पवार मांडवात घेण्यात आलेली बायांची पारंपारिक  लोकगीते खूपच गाजली . लोकगीतामध्ये भुलाबाईचे गाणे,लग्नाचे गाणे,सासुरवासिनचे गाणे,बदकोमाचे गाणे,दळणाचे गाणे या विषयावर लोकगीते सादर करण्यात आली. या लोकगीतांना झाडी प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामण लांजे ,प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धांर्थ रामटेके, प्रणाली जिल्हेवार होते. 
    या  कार्यक्रमात सामील झालेल्या मंगला लेनगुरे यांनी भुलाईचे गाणी ,सुवर्णा वाढई ,सुमनबाई जेंगठे दिवसभर यांनी लग्नाची गाणी,कमलबाई शेडमाके यांनी सासुरवाणीची गाणी,बोंताताई कनावार यांनी बदकोमाची गाणी,भिवराबाई आत्राम यांनी दरण दळण्याची गाणी  सादर केल्या. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृंदा पगडपल्लीवार  यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती लखमापूरे यांनी केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण खोब्रागडे, रंजित समर्थ,गणेश खोब्रागडे, अरूण झगडकर व सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!