प्राथमिक आरोग्य केंद्र शेगांव (बु) येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुंडण आंदोलन
मुंडण आंदोलनांची दखल नाही घेतली तर प्रहार सेवक विनोद उमरे व आयोजक अक्षय बोंलगुलवार यांच्या आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर धिंगाणा घालून आंदोलन करू असा ईशारा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - प्राथमिक आरोग्य केंद्र शेगांव (बु) येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले.यावेळी मुंडण आंदोलनाच्या प्रमुख मागण्या म्हणजे १) प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावेत. २)तात्काळ रिक्त पदांची भरती करण्यात यावी.३)सुसज्य रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. ४) वाॅल कंपाऊंडरसाठी व अन्य कामांसाठी अतिरिक्त निधी त्वरित उपलब्ध करावा.५) सिटी स्कॅन व एक्सरे मशीन उपलब्ध करावी.
६)रूग्णालयासाठी लागणाऱ्या योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.कारण प्राथमिक आरोग्य केंद्र शेगांव (बु) येथे नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. येथील स्थानिक शेतकरी, कामगार,अपंग, विद्यार्थी यांना वरोरा सारख्या शहरात जाऊन उपचार करावा लागतो. म्हणून या सहाही मागण्याची मागणी करण्यात आली. व या मागण्या पूर्ण न झाल्यास आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर धिंगाणा घालून आंदोलन करू असा इशाराही प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिला.यावेळी आंदोलनाचे आयोजक अक्षय बोंदगुलवार , प्रहार सेवक शेरखान पठाण, अमोल दात्तारकर, गिताताई पुलकर महिला आघाडी प्रमुख, अशिद मेश्राम, किशोर डुकरे, व सामान्य नागरिक सुद्धा जास्त संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!