२९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये 'त्रिवेणींचा संगम' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
२९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये 'त्रिवेणींचा संगम' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नुकत्याच पार पडलेल्या विदर्भस्तरीय झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये कवयित्री प्रा.संगिता बढे वर्धा,कवयित्री उज्ज्वला कोल्हे कोपरगाव आणि सौ.किरण चौधरी गडचिरोली यांच्या हायकू काव्यप्रकारातील प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा.सा.कन्नमवार साहित्य नगरी जुनासुर्ला येथे त्रिवेणींचा संगम’ या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रिय अध्यक्ष डाॕ.हरिश्चंद्र बोरकर , उद्घाटक डाॕ.हेमकृष्णजी कापगते माजी आमदार साकोली, डाॕ.मनोहर नरांजे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलानाध्यक्ष , प्रमुख अतिथी अॕड.लख्खनसिह कटरे जेष्ट साहित्यिक गोंदिया,आचार्य ना.गो.थुटे वरोरा,ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर समन्वयक,कवी अरूण झगडकर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर,डाॕ.बळवंत भोयर नागपूर, लक्ष्मण खोब्रागडे मुल,प्रा.संगीता बढे वर्धा,उज्जवला कोल्हे कोपरगाव, किरण चौधरी गडचिरोली उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कवी सुनिल पोटे आणि विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ताटवाकार संतोष मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्य मंडळाच्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!